
पुणे( जनक्रांती प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर समाजमाध्यमावर आक्षेपार्ह्य टिप्पणी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे, त्यावर पुण्यात पिंपरी चिंचवडमधील स्थानिक अहिल्याप्रेमी संतप्त झाले आहेत. संतप्त अहिल्या प्रेमीनीं पिंपरीचिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणा बाजी करत माथेफिरू वर कडक कारवाई ची मागणी केली जात आहे.