दौंड(जनक्रांती प्रतिनिधी):
पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील सर्वात पवित्र सोहळा , लाखो भाविक, संतांच्या पालख्यांसह विठुनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे जात आहेत.राज्याचं वातावरण भक्तिमय झालं आहे यातच, वारीदरम्यान एक संतापजनक घटना समोर आली आहे.दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Pandharpur Rape) झाल्याचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांनी चहा पिण्यासाठी विश्रांती घेतली होती. दरम्यान दोन अज्ञात युवकांनी दुचाकीवरून येत वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लुटमार केली आणि यानंतर अल्पवयीन मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण दौंड परिसर हादरला आहे.
या घटनेनंतर दौंड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. मात्र, आरोपी फरार आहेत .
फरार आरोपी चां पोलिस शोध घेत आहेत.
वारीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर?
अशा पवित्र वारीदरम्यान बलात्काराची (rape )घडल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या घटनेनंतर वारीला जाणाऱ्या लाखो भाविकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
#पंढरपूर #वारी #बलात्कार #Rape
