
(जनक्रांती न्युजनेटवर्क): राज्यात मोबाईल द्वारे फोटो काढुन आॅनलाईन दंड आकरण्याचे प्रकार वाहतूक पोलीस कर्मचारी राजरोसपणे करत होते.राज्यातील त्रस्त नागरिकांनी तसेच वाहनचालक संघटनांनी आ. जयंत पाटील यांच्याकडे असे प्रकार थांबविण्याची मागणी केली होती. आ. जयंत पाटील यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला होता व संबंधित मंत्र्यांनी ह्याबाबत खुलासा केला होता.
इथुन पुढे राज्यातील कोणत्याही पोलिस कर्मचारी यांना वाहनांवर कारवाई करताना त्यांच्या मोबाईल द्वारे फोटो काढता येणार नाही. तसे झाल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे पत्र अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रविण सांळुके यानीं सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांना जारी केले आहे.
वाहनांवर कोण कारवाई करु शकतो, कायदा काय सांगतो?
मोटर परिवहन कायदा कलम १३२ नुसार, पोलिस उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना वाहनांची कागदपत्रे तपासण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दंड आकारता येणार नाही.
जर ह्या नियमांचे पालन नाही झाले तर नागरिकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार आहे.
Taking photo on mobilephone #traffic challan #latestnews #mobile photo not allowed for echallan
(फोटो: काल्पनिक)