
दिल्ली(जनक्रांती न्युजनेटवर्क):स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सुपर लीग मध्ये महाराष्ट्र राज्यातील पन्हाळा गिरिस्थान नगर पालिकेनं देशात अव्वल स्थान फटकाविले आहे.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे शुक्रवारी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ह्या पुरस्काराचे वितरण व सन्मान करण्यात आला.
पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतनकुमार माळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
श्री माळी यांनी घेतलेल्या पुढाकाराने महाराष्ट्राचा झेंडा पुन्हा एकदा दिल्लीमध्ये फडकला . हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपालिका ना आत्ता प्रेरणादायी ठरेल , येणाऱ्या काळात राज्यातुन अनेक नगरपालिकानां स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
मुख्याधिकारीमाळी व टिमचे कौतुक:
राजभरातुन मुख्याधिकारी चेतनकुमार माळी व त्यांच्या टिमचं कौतुक करण्यात येत आहे. चांगल्या कामाची पोहचपावती नक्कीच मिळते अशा भावना नागरिकांतुन व्यक्त होत आहेत