
Air India Flight crash update(जनक्रांती न्युजनेटवर्क)
अपघातापूर्वी पायलट्समध्ये काय संभाषण झालं? ह्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा (Gujarat Air India Plane Crash) प्राथमिक अहवाल समोर आला आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत त्यामुळे अपघाताचं प्राथमिक कारण समोर आलं आहे.
विमान टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच कोसळले. याचे एक महत्त्वाचे कारण दोन्ही इंजिन बंद पडणे होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विमानाने आवश्यक उंची गाठली होती, परंतु त्यानंतर दोन्ही इंजिने ‘रन’ मोडवरून ‘कटऑफ’ मोडवर गेली.
AAIB च्या अहवालात पायलटचं संभाषण समोर:
व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये अपघाताच्या काही क्षणांपूर्वी एक पायलट दुसऱ्याला विचारतो, तु इंजिन कटऑफ का केलंस?, त्यावर मी काहीही केलं नाहीय, असं दुसरा पायलट उत्तर देतो. दोन्ही पायलट्समधील हे संभाषणाचा उल्लेख प्राथमिक चौकशीच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.