
Nimisha Priya case:येमेन या देशामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशी देण्यात येणार आहे.सध्या निमिषा प्रियाची जगभरात एकच चर्चा सुरु आहे. तीला वाचवण्यासाठी कोणताच पर्याय नाही का? असं सोशल माध्यमांवर लोक व्यक्त होत आहेत.
भारतीय नर्सला येमेनी नागरिक तलाल अब्दो मेहंदीच्या हत्येप्रकरणी तिला 16 जुलै रोजी फासावर लटकवण्यात येणार आहे.
इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय नर्सच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. केरळची रहिवासी असलेल्या 37 वर्षीय निमिषा प्रियाची बातमी भारतीयांसाठी निराशाजनक आहे. प्रियाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण आता येमेनी नागरिक तलाल अब्दो मेहंदीच्या हत्येप्रकरणी तिला 16 जुलै रोजी फासावर लटकवण्यात येणार आहे.