
मुंबई (जनक्रांती विशेष प्रतिनिधी):
हिंदी सक्तीवरुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे , मनसे ने घेतलेल्या भूमिकेसोबत अजित पवारांनी ही हिंदीसक्तीला विरोध केल्याने फडणवीस- शिंदे गटाची प्रचंड मोठी गोची झाल्याचं पहायला मिळत आहे.
मनसे , शिवसेना ठाकरे गट यानीं पुकरलेल्या मोर्चा मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ही हिंदी सक्ती विरोधात मैदानात उतरणार असल्याची घोषणा झाली, त्यानंतर सरकारचा घटक पक्ष असलेले अजितपवार ही हिंदी सक्ती च्या भुमिकेवर ठाम असल्याने भाजप आणी एकनाथ शिंदे हे एकटे पडले आहेत.
एकनाथ शिंदे यांना मराठी माणसाची बाजु घ्यावं की भाजपचं एेकावं हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
मराठी माणूस मराठी भाषेला वाचवण्यासाठी पुढे येतो आहे अन् एकनाथ शिंदे गप्प आहेत ह्यावरुन शिंदेविरोधात मराठी जनमानसात मोठी नाराजी व्यक्त होत आहे.