
सोलापुर ( जनक्रांती प्रतिनिधी): येथे गुन्हे शाखेच्या पथकाने एक दबंग कामगिरी केली आहे, राज्यातील विविध शहरांमधुन १५ मोटरसायकली चोरी करणाऱ्या चोरट्यास सोलापुर पोलिसांनी सापळा रचुन अटक केली आहे.
सोलापुर शहरातील शेळगी रोड येथे चोरीची मोटर सायकल घेवुन संशयीत आरोपी उभा असल्याची गोपनीय माहिती सपोनि शंकर धायगुडे यांच्या पथकास मिळाली होती. पोलिसांनी सदर संशयित आरोपी ला पकडुन विचारपूस करताच आरोपीने सोलापुर शहर , लातुर , पुणे, इंदापुर , कर्नाटक राज्यातील काही भागातुन १२ मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
सोलापुर पोलिसांच्या ह्या धडाकेबाज कामगिरीचं सोलापुरकरांकडुन कौतुक होत आहे.