सोलापुरातील एका माजी महापौराने लॉजमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीमुळे माजी महापौर असेलल्या राजकीय नेत्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सोलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने लॉजच्या रूममध्ये जावुन महिलेचा विनयभंग करत किळसवाणे कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मनोहर सपाटे असं गुन्हा दाखल झालेल्या राजकीय नेत्याचं नाव असून तो सोलापूरचा माजी महापौर देखील राहिला आहे. मनोहर सपाटे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य आहेत.
शहरातील एका लॉजमध्ये महिलेसोबत किळसवाणे कृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. मनोहर सपाटे याच्याविरुद्ध एका 45 वर्षीय विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, तसेच दमदाटी केल्याचा केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
महापौर राहिलेल्या सपाटेचां विडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे, या घटनेने सोलापुरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

