जनसंघर्ष प्रतिनिधी (सांगली): गेल्या अनेक वर्षांपासून सांगली शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलं आहे. महापालिकेच्या कारभारावर सर्वसामान्य नागरिकांची नाराजी दिसून येत होती. व्यवसायधारकानां राजकीय आश्रय असल्याने पालिके कडुन कारवाई केली जात नव्हती मात्र धडाकेबाज आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील अतिक्रमणावर मोठी कारवाई केली आहे.
राज्याचे माजी मंत्री व भाजपचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांच्या अतिक्रमणांवर ही बुलडोझर चालवला आहे त्यामुळे भाजपच्या थेट आमदारालाच नडणाऱ्या या अधिकाऱ्याचं लोक कौतुक करत आहेत.
