
मुंबई ( जनक्रांती न्युज नेटवर्क):
राज्यात शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्ती च्या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यानीं पुकारलेल्या आंदोलनाचा धसका राज्यशासनाने घेतल्याचं चित्र पहावयास मिळाल आहे. राज्यात त्रीभाषिक सक्ती नंतर सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ह्यातच मनसे शिवसेना ( उद्धव ठाकरे ) यांच्या मोर्चात राष्ट्रवादी सामील होणार होती.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही हिंदी सक्तीला विरोध केल्यामुळे एकनाथ शिंदे -फडणवीस हे मात्र एकाकी पडले होते.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस ह्यानीं हे दोन्ही जी आर रद्द केल्याची माहिती दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकार नरमल्याची प्रतिक्रिया दिली तर शिवसेना (उभाठा)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अधिकृत भूमिका काय येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारची गोची म्हणूनच निर्णय मागे?
मनसे शिवसेना ठाकरे गटाच्या भुमिकेने राज्य सरकारची मोठी गोची झाल्यानेच हे जी आर रद्द करण्यात आला अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येत आहेत.