
मुंबई (जनक्रांती न्युजनेटवर्क):
मीरा रोड येथील एका मिठाई दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिला होता, मराठीचा अपमान केल्याबद्दल मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी गुरुवारी शहरात बंद पुकारला होता. अनेक दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती यावर आता मनसे या प्रकरणात अजुन आक्रमक झाली आहे.
मेहता बेहतानीं चड्डीत रहायचं, संदिप देशपांडे सज्जड दमाचं ट्विट!
व्यापारी आहात व्यापारीच रहा, आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करु नका, मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल.
बाकी मेहता बिहतानी चड्डीत राहायचं. तूर्तास एवढंच, असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलंय ह्यावरुन मनसे अधिक आक्रमक झाली आहे.