
अल्बामा( जनक्रांती न्युजनेटवर्क)
मेंढपाळाच्या मुलगी असलेल्या शुभांगी संतोष घुले हिने अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 21व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये Ultimate fire fighting challenge या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून भारताचे नाव उज्वल केले आहे. जगातील अग्निशमन व पोलिस दलाचे उत्कृष्ट संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
शुभांगीचा प्रवास हा खूप खडतर व आव्हानांनी भरलेला आहे. वडिलांच्या मेंढपाळ व्यवसायामुळे तिला आश्रमशाळेत राहून शिक्षण घ्यावे लागले. परिस्थितीशी दोन हात करून उच्च शिक्षण व नंतर पनवेल महानगरपालिकेमध्ये अग्निशामन दलामध्ये कामाला लागली.
शुभांगी घुले हिचे यश नक्कीच इतरांना प्रेरणा देईल.
शुभांगीची प्रतिक्रिया – ” मेंढपाळ असणारे माझे आई वडील मला नेहमीच प्रोत्साहन देत असतात, त्यांच्याकडून मला खूप मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. ही स्पर्धा माझ्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव होता. देशासाठी पदक जिंकले याचा मला अभिमान वाटत आहे. यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी करण्याचे माझे पुढील ध्येय राहील. पुढील वर्षी स्पर्धा भारतामध्ये होणार आहे त्यामूळे अजून चांगल्या तयारीने या स्पर्धेला सामोरे जाणार आहे. “