
दिल्ली: (जनक्रांती न्युज नेटवर्क)
भारतीय जनता पाट्रीचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांना महाराष्ट्राबाहेर आपटून मारण्याचं विधान केलं आहे. महाराष्ट्रात व्यापार व्यवसाय नाही मराठी माणूस परप्रांतीयांच्या टॅक्सवर जगतो असं खा. दुबे म्हणाले.
खासदार दुबे हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाष्य करताना मराठी माणसांवर गरळ ओखली आहे.
खा. दुबे पुढे म्हणाले , मराठी लोक टॅक्स भरत नाही ,परप्रांतीय टॅक्स भरतो असं म्हणत नवीन वादाला तोंड फोडलं आहे.