लातुर( जनक्रांती प्रतिनिधी): येथील उदगीर च्या भीमातांड्यावर पोटच्या चार वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळुन निर्घुन खुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
लातुर जिल्ह्यातील उदगीर येथील भीमतांड्यावरील एका चार वर्षीय चिमुरडीने आपल्या बापाकडे चाॅकलेटचा हट्ट केला. संतापलेल्या नराधम बापाने पोटच्या लेकीचा साडीने गळा आवळला, इतक्यातच तो थांबला नाही तर जीव जाई पर्यंत त्याने गळा आवळुन धरला अन् चिमुरडीचा जीव गेला.
ह्या घटनेने संपूर्ण लातुर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय तर नराधम बापाला फाशी ची शिक्षा द्यावी अशी मागणी पत्नी ने केली आहे.
