भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनीं गेल्या दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच नाव बदलून बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
मेधा कुलकर्णी यांच्यावर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जोरदार टीका झाली. यांनतर पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता बॅनर वॉरला सुरवात झाल्याचं पहावयास मिळत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पोस्टरच्या माध्यमातून टीका केली जात आहे.
काय आहे बॅनर वरील मजकुर?
कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा” अशा आशयाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी झळकले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या बाजीराव पेशवे यांचं शनिवारवाड्यात वास्तव्य होतं त्याच शनिवारवाड्याच्या अगदी जवळच असे बॅनर लागले आहेत. त्यामुळे नवीन पोस्टर वाॅर कधी थांबेल हे पहाणं गरजेजचं आहे.