
दुबई ( जनक्रांती न्युज नेटवर्क): येथील ग्लेन्डल आंतरराष्ट्रीय शाळेत आज एस के जी फाऊंडेशन चा पाचवा वर्धापन दिन सोहळा थाटात पार पडला. दरम्यान फाऊंडेशन च्या वतीने दुबईतील महिला सभासदांचा स्मृतीचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
नृत्य, नाटिका, एकांकिकेने सभागृह दणाणून निघाले. युएई मधील कामगार आणि गरजू महिलांना संघटित करून SKG Foundation ही संस्था स्थापन करण्यात आली होते , मागील ४ वर्षात संस्थेने अनेक महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी मोलाचे सहकार्य केलं आहे. SKG संस्थेतील विविध जातीधर्मातील सभासदांसाठी अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रम राबविले जातात.
आजच्या कार्यक्रमात ग्लेन्डन आंतराष्ट्रीय शाळेचा परिसर मराठी गाणी नृत्यसंगिताने दुमदुमून निघाला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातुन मराठीचा झेंडा परदेशात फडकवणारे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी काका नरुणे यांचं दुबईतील सर्व मराठी बांधवांमधुन कौतुक होत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या साक्षी मोरे, सिध्दार्थ कांबळे , प्रशांत बेले, संतोष भस्मे, उषा कदम, व शिवाजी काका फाऊंडेशन चे सदस्य यानीं प्रयत्न घेतले.