
सोलापुर( जनक्रांती प्रतिनिधी):
येथील पंढरीच्या वारीसाठी आलेल्या २१ वर्षीय तरुण नदीत स्नान करताना वाहुन गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.
मी ही यंदा वारीत जाईन, असा हट्ट धरणारा २१ वर्षीय युवक नीरा नदीत स्नान करताना वाहून गेल्याची दु:खद घटना घडली आहे . ह्यानंतर आज्जीने कशाला वारीचा हट्ट केलास रं बाळा? म्हणत टाहो फोडला.
लेकीला काय सांगु ? आत्ता घरी कोणत्या तोंडाने जावु ? कशापायी तु वारीचा हट्ट केलास ? असे हुंदके देत टाहो फोडणार्या आज्जीच्या रडण्याने संपुर्ण परिसर हळहळला.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील झिरपी या गावातील प्रयागबाई प्रभाकर कराबे या आपल्या २१ वर्षाच्या नातवासह वारीसाठी आल्या होत्या. प्रयागबई कराबे यांच्यासोबत लेकीचा लेक आला होता. नातवाने वारीला येण्यास प्रचंड हट्ट केला तेव्हा आज्जी असणार्या प्रयागबाई यांनी नातवाला वारीला घेवुन आल्या.
नीरा नदीत स्नान करताना गोविंद कल्याण फोके वय २१ रा . झिरपी ह्या नातवांचा दुर्दैवी अंत झाला.