
मध्यप्रदेश( जनक्रांती न्युजनेटवर्क):
प्रेम काही सांगुन होत नसतं, ह्याची अशीच एक प्रचिती नुकतीच आली. एक महिला शिक्षिका आपल्याच विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली.तिने आपल्याच विद्यार्थ्याला प्रपोज केला. प्रिया तिथे काही वर्षापासून गेस्ट टीचर म्हणून नियुक्त होती.
महाविद्यालयीन तरुणतरुणीने प्रपोज केला प्रेम केला हे स्वभाविकपण एेकतो.
कॉलेजमध्ये मुलं मुलींना प्रपोज करतात. काहीवेळा मुली मुलांना प्रपोज करतात. इथपर्यंत ठीक आहे. मात्र महिला प्रोफेसरला एखादा विद्यार्थी आवडला तर? ती त्याच्या प्रेमात पडली तर? असाच प्रकार मध्य प्रदेश राज्यातील खंडवा येथे घडला.
एका महिला शिक्षिकेचा आपल्याच विद्यार्थ्यावर जीव जडला. ती शिक्षिका विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. तिचं ते एकतर्फी प्रेम सुरच होतं .
एकेदिवशी तिने विद्यार्थ्याला प्रपोजच केला. तु माझ्याशी लग्न करशील का?
त्यावर विद्यार्थ्याचं उत्तर ऐकून शिक्षिकेला मोठा झटका बसला. या महिला शिक्षिकेन स्वत:च आयुष्यच संपवलं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
पुनासा चौकी क्षेत्रातील घटना आहे. आयटीआय कॉलेजमध्ये शिकवणारी शिक्षिका प्रिया यादवला तिचाच विद्यार्थी सपन यादव आवडू लागला. ती त्याच्या प्रेमात पडली. सपन 24 वर्षांचा आहे.
पोलीस चौकशीत सपनने सांगितलं की, आयटीआय नर्मदा नगरमध्ये तो शिक्षण घेतोय. प्रिया तिथे काही वर्षापासून गेस्ट टीचर म्हणून यायची. शिकता, शिकता दोघांमध्ये प्रेम झालं. मोबाइलवर त्यांच्यात बोलणं व्हायचं. हळूहळू हे प्रेमसंबंध बहरत गेले. दोघांच मागच्या वर्षभरापासून अफेअर सुरु होतं. दोघांच्या कुटुंबियांना सुद्धा या नाताबद्दल माहित होतं.
शुक्रवारी प्रियाने सपनला आपल्या घरी बोलावलं. तिथे ती त्याच्याबरोबर लग्नाच्या विषयावर बोलली. सपन तिला बोलला की, आधी मला माझ्या पायावर उभं रहायचय. मला नोकरी करायची आहे.त्यानंतरच लग्नाचं बघेल. हे ऐकून प्रिया नाराज झाली. तिने मोबाइल जमिनीवर आपटून तोडला. नंतर ती खोलीत निघून गेली. अर्धातास ती खोलीबाहेर आली नाही. मग सपनने घराच्या छतावर जाऊन खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. प्रियाने स्वताचं जीवन संपवलं होतं.
प्रियाने लग्नाची मागणी घातल्यानंतर सपनने तिला नकार दिला. यामुळे प्रियाला खूप दु:ख झालं. तिने शुक्रवारी राहत्या घरी आपलं आयुष्य संपवलं. सपन आसपासच्या लोकांच्या मदतीने प्रियाला रुग्णालयात घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.