
मुंबई (जनक्रांती न्युज नेटवर्क): आज, 5 जुलै रोजी वरळी डोम येथे शिवसेना मनसेने विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता ह्या मेळ्यांत , राष्ट्रवादी ( पवार गट) राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी रोखण्मेया एकजुठ दाखवली.
या मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जवळपास 18 वर्षांनी एकत्र आले आहेत. अनेकांची कित्येव वर्षांपासून त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. हा मेळावा संपताच सुनील केडिया यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली आहे.
सुनील केडिया यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ते, ‘नमस्कार, माझा ट्वीटचा वेगळा अर्थ काढण्यात आला’ असे बोलताना दिसत आहेत. पुढे व्हिडीओमध्ये त्यांनी राज ठाकरेंची माफी मागितली आहे. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी माझे वक्तव्य मागे घेतो असं केडीया म्हणाले.