
रायगड (जनक्रांती न्युज नेटवर्क):
आज पर्यंत छत्र निजामपूर” म्हणुन ओळकण्यात येणारा रायगड परिसर, आता “किल्ले रायगड ग्रामपंचायत” व्हावी ह्या मागणी साठी भाजप आमदार गोपिचंद पडळकर ह्यानीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेवुन मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी स्थापन केली, तो रायगड किल्ला आज “छत्र निजामपूर ग्रामपंचायत” या नावाने ओळखला जातो, ही आपल्या अस्मितेची शोकांतिका असल्याचं आ. पडळकर म्हणाले.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन “छत्र निजामपूर” हे नाव बदलून “किल्ले रायगड ग्रामपंचायत” असे करण्याची अधिकृत मागणी करणारे निवेदन आ. पडळकरानीं दिले.
या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रायगडवाडी, वाघेरी, हिरकणवाडी, नेवाळीवाडी, पेरूचादांड, आदिवासीवाडी यासह अनेक ऐतिहासिक वाड्यांचा समावेश आहे. छत्रपतींच्या राजधानीला तिचा गौरवशाली इतिहास सन्मान मिळावा.
या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
#DevendraFadnavis
#GopichandPadalkar
#विधानभवन_मुंबई
#किल्ले_रायगड_ग्रामपंचायत