
बीड( जनक्रांती प्रतिनिधी): येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, बीड पोलिस दलात ASI म्हणून कार्यरत असलेला पोलिस अधिकारीच चोर निघाल्याचं समोर आलं आहे.
ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळं पोलिस कर्मचारी तणावात होता लोकांकडुन घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चक्क चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यापूर्वी देखील या पोलिसाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच 58 बॅटऱ्यांची चोरी केली होती. अमित मधुकर सुतार असं त्याचं नाव असून ते बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.