
मुंबई ( जनक्रांती न्युज नेटवर्क): शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासा मध्ये कॅन्टीन कर्मचाऱ्यांस मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री घडल्याचं समोर येत आहे. शिंदेगटाच् आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिलं म्हणून एका कर्मचाऱ्यास जोरदार मारहाण केली आहे.
उपस्थितीत पैकी आ. संजय गायकवाड यांना थांबण्याची विनंत करत होते परंतु ते मारतच राहिले.
आमदार गायकवाड हे शिंदेगटाचे आहेत म्हणून ह्यावर कारवाई होईल का असा प्रश्न सोशल मीडियात विचारला जात आहे.