
अमेरिकेने तीन अणुकेंद्रांवर केलेल्या माऱ्याचे प्रत्युत्तर म्हणून सोमवारी इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. शस्त्रबंदीच्या उभंरठ्यावर असतानाही इराणने आपला आक्रमकपणा कमी केल्याचा दिसत नाही.
इराणने काय म्हटले?
आजपर्यंतच्या इतिहासात जगातील कोणत्याही देशाने अमेरिकेच्या लष्करी तळांवर कोणी हल्ला केला नाही मात्र इराणने ते केले. तुम्ही ह्याला प्रतीकात्मक प्रत्युत्तर म्हणू शकता मात्र जर पुन्हा अमेरिकेने या पुढे अशी बेकायदेशीर कृती केल्यास त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणचे राजदूत म्हणाले आहेत.
इराण यापुढे ही इस्रायली कारवाई ला निर्णायक उत्तर देईल असं ते ठामपणे म्हणाले.
यावर बोलताना डॉ. इलाही म्हणाले की, “इराण हा एनपीटीचा सदस्य आहे. इराणकडे कोणते अण्वस्त्रे नाहीत. इस्रायलमधील बेकायदेशीर राजवटीने युरेनियम असल्याचे कारण देऊन इराणवर हल्ला केला. हे हास्यास्पद आहे. इस्त्रायल या प्रदेशातील स्थिरतेवर परिणाम करत आहे.”
दरम्यान दोन्ही देशांमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमूवर इराणने या करारतून स्वतःला मुक्त करण्याची धमकी दिली होती. हा करार अणवस्त्रांचा प्रसार रोखणे आणि अणुउर्जेचा शांततापूर्ण वापरास प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेला आहे.
